Sun. Oct 17th, 2021

कोंबड्यापासून सावध रहा! इथे आहे फक्त कोंबड्याची दहशत

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर

 

कोल्हापुरातील कसबा बावड्यात एका कोंबड्याने आपली चांगलीच दहशत निर्माण केली आहे. कोंबड्याच्या दहशतीमुळे कोंबड्यापासून सावधान असा फलकच लावण्याची

वेळ घरमालक सतीश पाटील यांच्यावर अाली आहे.

 

सतीश पाटील यांनी कराड मधून सहा महिन्यांपूर्वी आणलेला हा ऐटदार कोंबडा त्यांच्या घरात कोणालाही सहज प्रवेश मिळू देत नाही.

 

तसा कोणी घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर या कोंबड्याची त्याच्या अंगावर झडप ठरलेली आहे. त्यामुळे गल्लीतील सर्वजण घाबरून जात आहेत तर लहान मुले

मुद्दामहून त्याला डीवचण्याचा प्रयत्न करत आहेत.

 

आतापर्यंत इमाने इतबारे सेवा करणाऱ्या कुत्रासाठी कुत्र्यापासून सावधान असे सर्रास दिसणाऱ्या फलकात मात्र कोंबड्यापासून सावध राहा असा फलक आता झळकल्याच

दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *