अनियमित एसटी बस फेऱ्यांविरोधात विद्यार्थ्यांनी एसटी डेपोत भरवले कॉलेज

कोल्हापूर : एसटी विभागाच्या अनागोंदी कारभाराविरोधात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एसटीच्या कार्यालयातच कॉलेज भरवलंय. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सध्या परीक्षा सुरु आहे. परंतु एसटीच्या मनमानी कारभारामुळे केव्हाही एसटी बस रद्द करण्यात येते.
त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागते. यामुळे या विद्यार्थ्यांनी एसटीच्या विभाग नियंत्रकाच्या कार्यालयातच कॉलेज भरवलंय.
गिरगाव ते नंदगाव मार्गावरील एसटीच्या फेऱ्या अधिकारी मनमानी पद्धतीने रद्द करत आहेत. गिरगाव ते नंदगाव मार्गावर 400 पेक्षा अधिक पासधारक विद्यार्थी आहेत.
तरी देखील या मार्गावर एसटी फेऱ्या कमी आहेत. मोजक्याच बस फेऱ्या असल्याने विद्यार्थ्यांना एकाच बसमध्ये गर्दीतून प्रवास करावा लागतो.
त्यामुळे एसटी प्रशासनाच्या ढिसाळपणाला कंटाळून हे पाऊल उचललं आहे. तसेच गिरगाव- नंदगाव मार्गावरील फेऱ्या नियमित करण्याची मागणी देखील यावेळी विद्यार्थ्यांनी केली आहे.