Sun. Jun 20th, 2021

कोल्हापूरात महापूर, 82 बंधारे पाण्याखाली

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर

 

कोल्हापूरला महापुराचा विळखा कायम आहे. पुराचं पाणी कोल्हापूर शहरात शिरलं आहे. जिल्ह्यातले 82 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूरात सगळीकडे पाणीच पाणी दिसतं. त्यामुळे अनेक रस्ते बंद आहेत.

 

29 रस्त्यांवरुन सुरक्षिततेसाठी वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुराच्या पाण्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. गेले काही दिवस पावसानं कोल्हापूर जिल्ह्यात अक्षरक्ष धुमाकुळ घातला. पावसानं उसंत घेतली असली तरी पाणी ओसरलं नसल्यानं महापुराचा विळखा कायम आहे.

 

नद्यांच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होत आहे. राधानगरी धरण 90 टक्के भरलं आहे. राज्यात आज शिक्षक पात्रता परीक्षा आहे. पण कोल्हापुरात महापूर असल्याने अनेक विद्यार्थी या परीक्षेला मुकण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *