Sat. Jan 22nd, 2022

15 जुलैपासून कोल्हापुरात हेल्मेट सक्ती; शिवसेना आमदाराचा विरोध

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर

 

कोल्हापुरात येत्या 15 जुलैपासून हेल्मेट सक्ती केली जाणार आहे.

 

मात्र, या हेल्मेट सक्तीला शहरातील आमदार राजेश क्षीरसागर यांनी विरोध दर्शवला आहे.

 

जनतेला विश्वासात न घेता ही हेल्मेट सक्ती केली जात असल्याचा आरोप राजेश क्षीरसागर यांनी शहर वाहतूक विभाग प्रशासनावर केला आहे.

 

दरम्यान, त्यांनी प्रशासनाला आंदोलनाचा इशाराही दिला. तसेच, सुरुवातीला प्रबोधन करून नंतरच हेल्मेट सक्ती करणार असल्याचं वाहतूक विभागाने स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *