Jaimaharashtra news

कोल्हापूरमध्ये सावकाराकडून नवविवाहीतेवर बलात्कार

पैशांच्या वसुलीसाठी एका सावकाराने नवविवाहीतेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोल्हापूरमध्ये हा प्रकार घडला आहे. एका गरजू कुटुंबाने घेतलेल्या पैशांच्या वसुलीसाठी त्या सावकाराकडून सतत दबाव होत होता. कुटुंबाला ते पैसे परत करण्यासाठी विलंब होत होता. धक्कादायक गोष्ट अशी की, याच कुटुंबातील एका नवविवाहीत तरूणीवर या सावकाराने बलात्कार केला आहे.

या गंभीर प्रकारामध्ये त्या तरूणीला सिगारेटचे चटकेही देण्यात आले आहेत. या प्रकारामध्ये पीडित तरूणीला मारहाणही केली आहे. संबंधित प्रकाराची पोलिसांना माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी कोल्हापूरमधील शाहुपुरी पोलिस स्टेशनमध्ये आरोपी सावकारासह इतर दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

तरूणीला सिगारेटचे चटके

पीडितेचा सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला आहे.

स्वतः या व्यवसाय करून उदरनिर्वाह करण्यासाठी या दाम्पत्याने सावाकाराकडून 30 हजार रुपये घेतले होते.

त्याचे व्याजही 10 हजार 500 दिले होते. मात्र तरीही व्याजाचा तगादा लावत धमकी देण्यात येत आहे.

एका गरजू कुटुंबाला पैशांची निकड असल्याने सावकाराकडून कर्ज घेतले होते.

या कुटुंबावर घेतलेल्या पैशांच्या वसुलीसाठी त्या सावकाराकडून सतत दबाव येत होता.

यातूनच पैशांच्या वसुलीसाठी त्या सावकराने कुटुंबातील नवविवाहीतेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

कोल्हापूरमध्ये हा प्रकार घडला असून अभियांत्रिकीचे शिक्षण या पीडित तरूणीने घेतले आहे.

या गंभीर प्रकारामध्ये त्या तरूणीला सिगारेटचे चटकेही देण्यात आले असून मारहाण करण्यात आली.

पोलिसांना माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

कोल्हापूरमधील शाहुपुरी पोलिस स्टेशनमध्ये आरोपी सावकारासह इतर दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

 

 

 

 

Exit mobile version