Wed. Dec 1st, 2021

कोल्हापूरमध्ये खाजगी बसमधून 19 लाखांची रोकड जप्त

निवडणुंकाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी जागोजागी नाकाबंदी करून आर्थिक उलाढालींमध्ये अनुचित प्रकरणांना आळा घालण्याचे महत्त्वाचे काम केले जाते.यातच  कोल्हापूरमधल्या गगनबावडा येथे एका खासगी बस मधून तब्बल 19 लाख 50 हजारांची रोकड जप्त करण्यात गगनबावडा पोलिसांना यश आले आहे. बुधवारी रात्री उशीरा ही खासगी बस गोव्याहून मध्यप्रदेशच्या दिशेने जात असताना मुंबई- गोवा महामार्गावर करण्यात आलेल्या नाकाबंदीमध्ये ही बस ताब्यात घेण्यात आली आहे.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कारवाई

निवडणुका  जवळ येत असून या काळात आर्थिक हालचालींना जोर येत असतो.

याच निवडणुकांदरम्यान गालबोट लागू नये, यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येते.

नाकाबंदीच्या दरम्यान कोल्हापूर मधील गगनबावडा येथे एका खाजगी बसमधून 19 लाख 50 हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

आचारसंहिता लागू झाल्यापासून आत्तपर्यंत 35 लाखापर्यंत रोकड हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे,

याप्रकरणी एका युवकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

इतक्या मोठ्या रक्कम नेमकी कशासाठी आणि कुठे नेली जात होती याचा तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *