Thu. May 6th, 2021

दीपक सुतार-महामुनी यांनी साकारली भव्य राम मंदिराची प्रतिकृती

अयोध्येत राम मंदिर न्यासाच्या वतीनं उभारण्यात येणाऱ्या नियोजित भव्य राम मंदिराबाबत देशवासियांमध्ये औत्सुक्य आहे. जगातील सर्वात भव्य मंदिर अशी राम मंदिराची संकल्पना आहे. अयोध्येत उभारल्या जाणार्‍या नियोजित राम मंदिराची अत्यंत सुबक हुबेहूब जवळपास ४० हून अधिक प्रतिकृती कोल्हापुरातील कलाकार दीपक सुतार-महामुनी यांनी साकारल्या आहेत.

दीपक सुतार-महामुनी यांचा ट्रॉफी आणि क्राफ्टपासून कलाकृती बनवण्याचा व्यवसाय आहे. त्यांनी आजवर क्राफ्टपासून अनेक सुबक कलाकृती साकारल्या आहेत. अयोध्येमध्ये राम मंदिराच्या पायाभरणीनंतर नियोजित राम मंदिराची लाकडी प्रतिकृती तयार करावी, असा त्यांचा विचार होता. मार्चच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी राम मंदिराची प्रतिकृती बनवण्याचा ध्यास घेतला. त्यांनी नियोजित मंदिराचे फोटो घेऊन, त्यानुसार प्रतिकृती तयार करण्याचा विचार केला. सलग ४८ तास संगणकावर बसून राम मंदिराच्या प्रतिकृतीचा अभ्यास केला. त्यानंतर लेझर कटिंग मशीनवर भुशापासून तयार केलेला लाकडी पुठ्ठा कापून, एक सुबक आणि नियोजित राम मंदिराची हुबेहुब प्रतिकृती साकारता आली.

दीपक सुतार यांच्या निलेश, विनय आणि साईनाथ या तीन मुलांनी वडिलांनी तयार केलेल्या लाकडी पुठ्ठ्यच्या कटिंग केलेल्या सुट्या भागापासून तीन मजली राम मंदिराची प्रतिकृती साकारली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *