Mon. May 23rd, 2022

कोल्हापुरकरांचा चायना वस्तूवर बहिष्कार घालण्याचा निर्धार

कोरोना विषाणूने जगभर हैदोस घातला आहे. या कोरोनामुळे अनेकांना आपल्या जावीला मुकावे लागले आहे. कोरोना विषाणूच्या पादुर्भावाला चीनमधून सुरुवात झाली. यामुळेच कोल्हापुरकरांनी चायनाच्या वस्तूवर बहिष्कार घालण्याचा निर्धार केला आहे.

चीनमुळे कोरोनाचा सामना संपूर्ण देशाला करावा लागत आहे. कोल्हापूरातही 3 रुग्ण आढळले आहेत. यापैकी ज्या परिसरात 2 रुग्ण आढळले तो भक्तीपूजा नगर परिसर पूर्ण सील करण्यात आला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या इथल्या नागरिकांनी चायना वस्तूंचे प्रदर्शन मांडत बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय.

कोल्हापुरातील ड्रायव्हर कॉलनी मित्र मंडळाने चायना बनावटीच्या वस्तुंवर बहिष्कार घातला आहे. या तरुणांनी ‘आम्ही ठरवलंय’ असा फळक लावला आहे. तसेच या फळकाच्या बाजूला चायना बनावटीच्या वस्तू लटकवण्यात आल्या आहेत. या चायना बनावटीच्या वस्तुंचा बहिष्कार घालावा, असं आवाहन तरुणाकडून करण्यात आलं आहे.

कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढतोय. राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा हा ३३५वर जाऊन पोहचला आहे. कोरोनाचा पादुर्भाव टाळण्यासाठी शासनाकडून जनतेला घरी बसण्याचं आवाहन केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.