Wed. Dec 8th, 2021

‘किती दिवस कोल्हापूर बुडताना पाहायचं?’

कोल्हापूर: खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापुरातील पुरस्थितीची पाहणी केल्यानंतर राज्य सरकारने समिती नेमून कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे. पुरग्रस्तांचे तातडीने पंचनामे करून त्यांना मदत देण्याची मागणी त्यांनी करताना केंद्राकडेही पाठपुरावा करू, असे आश्वासन त्यांनी दिलं आहे.

‘किती दिवस कोल्हापूर बुडताना पहायचे? पुररेषेतील बांधकामांचे नियम कडक करा’, अशी मागणी खासदार संभाजीराजे यांनी केली आहे. ‘रस्ते वारंवार पाण्याखाली जाऊन जर ते बंद होत असतील तर राज्य सरकारने याबाबत समिती नेमून कार्यवाही करावी’, अशी मागणीही त्यांनी केली आहे. पुरग्रस्तांचे तातडीने पंचनामे करून त्यांना मदत देण्याची मागणी त्यांनी करताना केंद्राकडेही पाठपुरावा करू असे आश्वासन त्यांनी दिलं.

‘रिमोर्ट सेन्सिंगच्या माध्यमातून एक सर्व्हे करून पुलांची उंची कशी वाढवता येईल हे पाहिलं पाहिजे. दरवर्षी पूर येणारच. पूर आला पाच दिवस एमर्जन्सी आली तर काय करणार?’, असा सवाल खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *