संघर्ष यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याचा आज दुसरा दिवस
जय महाराष्ट्र न्युज, कोल्हापूर
विरोधकांच्या संघर्ष यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याचा आज दुसरा दिवस आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी काढलेल्या या संघर्ष यात्रेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरें, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराच चव्हाण, अजित पवारांसह 40 आमदार सहभागी झाले आहेत.
यावेळी सुनील तटकरेंनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोतांवर निशाणा साधत त्यांचा शेतकऱ्यांशी संबंध राहिला नसून, त्यांनी भाजप आमदार म्हणून शपथ घेतल्याचा टोला लगावला. तसंच त्यांना शेतकऱ्यांशीही काही देणंघेणं राहिलं नसल्याची टीकासुद्धा तटकरेंनी केली.