Sun. Oct 17th, 2021

कोल्हापूरात ज्वलनशील वस्तूचा स्फोट; ट्रकचालकचा मृत्यू

ट्रकचालकचा ज्वलनशील वस्तूच्या स्फोटात मृत्यू

कोल्हापूरमधील उजळाईवाडी येथील टोल नाका जवळ ट्रकमधील ज्वलनशील वस्तूचा स्फोट झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. शुक्रवारी रात्री 10:45 वाजताच्या सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटात दत्तात्रय पाटील ( ट्रक चालक ) यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

नेमकं काय घडलं ?

कोल्हापूरमध्ये उजळाईवाडी येथे ट्रकमधून ज्वलनशील वस्तूचा स्फोट झाला.

स्फोट झाल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून चालकाचा मृत्यू झाला.

ट्रकमधील माल शिरगाव येथे उतरवल्यानंतर कोल्हापुरात परतत असताना ट्रकमध्ये तांत्रिक बिघाड झाला.

त्यामुळे हा भीषण स्फोट झाल्याचे समजते आहे.

अचानक स्फोट झाल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *