Fri. Aug 12th, 2022

कोल्हापुरात व्यापारी विरुद्ध प्रशासन संघर्ष सुरु

कोल्हापूर :  कोल्हापुरात या आठवड्यात सुद्धा  निर्बंध कायम असल्याने व्यापारी विरुद्ध प्रशासन असा संघर्ष सुरू आहे.आज दुकाने कोणत्याही परिस्थितीत उघडण्याची मागणी करत व्यापारी रस्त्यावर उतरले आहेत.रविवारी चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे दुकाने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला होता.प्रशासनाने विरोध केला तर त्याला संघटितपणे सामोरे जाऊ अशी भूमिका चेंबर ऑफ कॉमर्सने घेतली आहे. तसेच पालिका अधिकारी कारवाई करण्यावर ठाम आहेत.

आज सकाळपासूनच महाद्वार रोड परिसर मोठ्या संख्येने गजबजला आहे. ‘सकाळी ९ ते संध्याकाळी ४ पर्यंत आम्ही सगळे दुकाने उघडणार’, अशा भूमिकेवर व्यापारी ठाम आहेत .’आमच्या मुळे कोरोना होत असेल तर निश्चित आम्ही दुकाने बंद करतो’ . गेले ८१ दिवस दुकाने बंद असल्यामुळे कपड्याची घडी उघडताच कपडे फाटू लागले आहेत. ‘आम्हाला २५००० चे पॅकेज द्या , दुकान बंद करतो’. या मतावर व्यापारी ठाम आहेत.मात्र अत्यावश्यक सेवा सोडून कोणतेही दुकान उघडले जाणार नाही.जर कोणी दुकान उघडेल तर त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. या भूमिकेत पालिका अधिकारी ठाम आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.