Fri. Sep 30th, 2022

व्यापाऱ्यांसमोर प्रशासन नमले

कोल्हापूर : दुकानं सुरू करण्यावरून कोल्हापूर शहरामध्ये व्यापारी व प्रशासनामध्ये संघर्ष झाला होता . दुकाने सुरू करण्याच्या भूमिकेवर व्यापारी ठाम आहेत. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करण्याचे आवाहन करणाऱ्या अधिकाऱ्यांशी वाद घातला. कोल्हापूर शहरातील करोनाचे रुग्ण वाढत चालल्याने लॉकडाउनचे निर्बंध कडक केले आहेत. अत्यावश्यक सेवा सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता.
गेले दोन आठवडे व्यापारी व्यापार सुरु करण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी लढा देत आहेत. तसेच त्यांनी गेल्या आठवड्यात दुकानांसमोर उभे राहून व्यापार सुरु करण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले होते . तर गेले दोन दिवस व्यापाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरू होते. तब्बल तीन महिन्यानंतर कोल्हापूरतील सर्व दुकाने खुली करण्यास आज पासून परवानगी मिळालीय.व्यापाऱ्यांनी फटाके फोडून आनंद साजरा करत आज दुकाने उघडली.सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत ही दुकाने खुली राहणार आहेत . मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर मात्र पुढच्या आठवड्यात वेगळा निर्णय घेण्यात येईल असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.पुढच्या आठवड्यात जर रुग्णसंख्या वाढली तर पुनर्विचार होणार असे सतेज पाटील यांनी सांगितले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.