Mon. Jul 22nd, 2019

भौगोलिक मानांकनात कोल्हापुरी चपलांचा समावेश

0Shares

पारंपरिक पोषाखावर कोल्हापूरी चपलांचा एक वेगळाच मान असतो. शिवाय टिकाऊ चप्पल म्हणून कोल्हापुरी चपलेला लोकांची पसंती असते. आता तर कोल्हापुरी चप्पल हा परंपरेचाच एक भाग बनलाय. कोल्हापूरची ओळख असणाऱ्या याच कोल्हापुरी चपलेला आता भौगोलिक मानांकन प्राप्त झालं आहे. यापुढे केवळ महाराष्ट्राच्या चार आणि कर्नाटकातील चार जिल्ह्यांमध्येच तयार होणाऱ्या चपलांना कोल्हापुरी चपलेचा ‘टॅग’ मिळणार आहे. या मानांकामुळे कोल्हापुरी चपलेची ओळख सर्वदूर पोहोचणार आहे.

कोल्हापुरी चपलेला मिळाले भौगोलिक मानांकन

कोल्हापूरची ओळख असलेल्या कोल्हापुरी चपलेला नुकतेच भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे.

पारंपारिक पोषाखावर किंवा सर्रास वापरण्यात येणाऱ्या या चपलेची ओळख मानांकनमुळे जगभरात पोहोचणार आहे.

कोल्हापुरी चपला महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यात तर कर्नाटकमधील धारवाड, बिजापूर, बागलकोट, बेळगाव या जिल्ह्यात तयार केल्या जातात.

यापुढे केवळ या ठिकाणीच तयार होणाऱ्या चपलांना कोल्हापुरी चपलेचे टॅग मिळणार आहे.

या जिल्ह्यांव्यतिरिक्त इतर ठिकाणी तयार होणाऱ्या कोल्हापूरी चपला कोल्हापूरी म्हणून ओळखल्या जाणार नाहीत.

यामुळे बनावट कोल्हापुरी चपलांना चांगलाच चाप बसणार आहे.

आतापर्यंत केवळ 326 उत्पादनांना भौगोलिक मानांकन प्राप्त झाले होते. त्यात आता कोल्हापूरच्या चपलांचा समावेश करण्यात आला आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: