Tue. Jun 18th, 2019

IPL 2019 : कोलकाताचा बेंगळुरूवर 5 गडी राखून विजय

24Shares

आयपीएलच्या मोसमात आत्तापर्यंत विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला एकाही विजयाचं खात उघडता आलेलं नाही. बेंगळुरू विरुद्ध कोलकाताच्या सामन्यात 5 गडी राखून कोलकात्ताने विजय मिळवला.कोलकाताने 4 सामन्यांपैकी 2  सामने जिंकले आहेत. हा सामना बंगळुरूच्या घरच्या मैदानावर होता. या सामन्यात कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला प्रथम फलंदाजी करत बंगळुरूने 204 धावा काढल्या.एवढं तगड आव्हान ठेवूनही कोलकाताने पाच गडी राखत बंगळुरुचा पराभव केला.

बेंगळुरूचे कोलकातासमोर २०5 धावांचे आव्हान

नाणेफेक जिंकत कोलकाताचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला

सलामीवीर पार्थिव पटेल 25  धावांवर बाद झाला

तर 84 धावांवर विराट कोहली झेलबाद झाला. आणि विराट कोहली दुसरा धक्का बसला.

एबी डिव्हिलियर्स 63  धावांवर झेलबाद झाला.

बेंगळुरूने कोलकातासमोर विजयासाठी 206 धावांचे आव्हान ठेवले.

कोलकाताचा 5 गडी राखून विजय

सलामीवीर सुनील नरेन 10 धावांवर बाद कोलकाताला पहिला धक्का बसला

रॉबीन उथप्पा 33 धावा काढून माघारी गेला तर कर्णधार दिनेश कार्तिक 19 धावांवर बाद

राणा 37 धावांवर बाद झाला आणि  लीन 43  धावांवर  तंबूत परतला

रसेलने अवघ्या 13 चेंडूत नाबाद 48  धावा काढून कोलकातासाठी विजय खेचून आणला.

 

24Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *