Sun. Sep 19th, 2021

तेलंगणात बस कोसळून 43 जणांचा मृत्यू

तेलंगणामधील जगतियाल येथे झालेल्या भीषण अपघातात 43 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय अनेक लोक जखमीही झाले आहेत. अपघात झालेली बस राज्य परिवहन मंडळाची होती. ब्रेक फेल झाल्याने कोंडागट्टू घाटाजवळ ही बस दरीत कोसळली.

 

अजूनही कोंडागट्टू घाटात बचावकार्य सुरू आहे. जखमींना उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केलं गेलं आहे.

 

ही बस कोंडागट्टू हनुमान मंदिरावरून जगतियाल येथे जात होती. या बसमध्ये एकूण 62 जण प्रवास करत होते. उतारावर बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे बसने चारवेळा पलटली आणि दरीत कोसळली.

 

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी अपघातावर शोक व्यक्त केला आहे. तसंच अपघातातील मृतांच्या नातेवाइकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *