Thu. Sep 29th, 2022

कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावर चिपळूण ते अंजनीच्या दरम्यान रुळावर माती आल्यामुळे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. रिणामी कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मांडवीसह मुंबईकडे जाणारी एक एक्स्प्रेस अशा दोन गाड्या दोन तास स्थानकातच थांबवल्या होत्या. गुरुवारी दुपारी हा प्रकार घडला आहे . गेले आठ दिवस चिपळूण, खेड परिसरामध्ये जोरदार पाऊस पडतो आहे. त्यामुळे वाशिष्ठी, जगबुडी नद्या दुथडी भरून वहात आहेत. डोंगरातील झरे वेगाने प्रवाहीत झाले असून त्या पाण्याबरोबर मातीही वाहून येत आहे. त्याचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे.अंजनी-चिपळूण दरम्यान रेल्वे ट्रॅक वरती दरड कोसळली आहे. यामुळे रेल्वे ट्रॅक वर दगडी कोसळली आहेत. परिणामी कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरु केले आहे. सध्या युद्ध पातळीवर दरड बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

हवामान खात्याकडून पुढील ४८ तासांत महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, कोल्हापूर, गडचिरोली या जिल्ह्यांना १६ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे महत्त्वाच्या कामाव्यतरिक्त घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण रेल्वे प्रशासनाला मातीचा ढीगारा साचलेल्या ठिकाणी जाऊन तो दूर करेपर्यंत वाहतूक ठप्प राहिली. मातीचा ढिगारा उपसून वाहतूक पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असल्याची माहिती प्रशासनाकडून दिली जात आहे.. अद्यापही वाहतूक धिम्या गतीनेच सुरु आहे. मातीच्या ढिगाऱ्याने मार्ग बंद झाल्याने चिपळूण ते खेड दरम्यान वाहतूक थांबविण्यात आली होती. दुसऱ्या बाजूला . मुंबईहून मडगावकडे जाणारी मांडवी एक्स्प्रेस खेड स्थानकात थांबवण्यात आली होती. तर चिपळूण स्थानकात मुंबईकडे जाणारी एक एक्स्प्रेस सुद्धा रोखण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.