Sun. Sep 22nd, 2019

रत्नागिरी स्थानकात प्रवाशांनी रोखली पॅसेंजर…

0Shares

काल पाच दिवसांच्या गणपतीला निरोप देऊन मुंबईत परतणारे रत्नागिरीतील चाकरमानी मंगळवारी सकाळी रेल्वे डब्यात जागा नसल्यानं संतप्त झाले.

रत्नागिरीवरुन मुंबईसाठी सुटणाऱ्या दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेनमध्ये सिंधुदुर्गमधून प्रवासी बसून आल्याने रत्नागिरी स्टेशनवर थांबलेले प्रवाशांना जागा मिळाली नाही. 

यामुळेच संताप व्यक्त करत प्रवाशांनी रत्नागिरी स्थानकात पॅसेंजर ट्रेन रोखली. तब्बल दोन तासांपासून संतप्त प्रवाशांनी ट्रेन रोखून धरली आहे.

ताबडतोब रेल्वे पोलीस अधिकारी रत्नागिरी स्थानकात दाखल झाले असून प्रवाशांची समजूत काढून रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न करत आहेत.

 

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *