Tue. Jul 27th, 2021

कोरेगाव भीमामध्ये अभिवादनासाठी लाखोंची गर्दी

कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक स्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यासह देशभरातील नागरिक सोमवारी रात्रीपासूनच गावात पोहोचले आहेत. गेल्या वर्षीच्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर यंदा पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून विशेष तयारी करण्यात आली असून छुपे कॅमेरे, सीसीटीव्ही, ड्रोन यांच्या साहाय्याने परिसरावर नजर ठेवली जाणार आहे. दरम्यान, भारिप बहुजन महासंघाचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सकाळी विजय स्तंभाला अभिवादन केले. आतापर्यंत दंगल घडवणार्‍यांवर सरकारकडून कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे समाजात तेढ निर्माण कसा होईल आणि दंगली कशा घडतील. हेच सरकार पाहत असल्याचा आरोप त्यांनी केला.

दरवर्षी 1 जानेवारी रोजी देशभरातील विविध संस्था, संघटना आणि आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येतात. दरम्यान, गतवर्षीपेक्षा यंदा विजय स्तंभाच्या ठिकाणी येणार्‍या नागरिकांची संख्या मोठी आहे. मागील वर्षाची येथील घटना लक्षात घेता कोणत्याही प्रकारची घटना घडू नये, याची दक्षता पोलीस प्रशासनाने घ्यावी, असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *