सातारा, सांगलीतील अनेक गावांत दुष्काळ असताना कोयना धरणाचे पाणी कर्नाटकला सोडले
जय महाराष्ट्र न्यूज, सातारा
महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सामंजस्य करारानुसाप कोयना धरणातून प्रति सेकंद 907 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीत केला जात आहे.
कर्नाटकात पाणी टंचाई असल्याने हा निर्णय जरी घेण्यात आला तरी सांगतील दुष्काळ असताना तिकडे पाणी देण्याबाबत सरकार उदासीन असल्याचा आरोप होत आहे.
हे पाणी सोडल्यामुळे सातारा आणि सांगलीत नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, सरकार दुष्काळी भागाची तहान न भागवता कर्नाटकला मदत करत असल्यानं नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.