Jaimaharashtra news

अखेर कोयना धरणातून कर्नाटकसाठी पाणी सोडले

 

जय महाराष्ट्र न्यूज, सागंली

 

कर्नाटकला अडीच टीएमसी पाणी देण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर कोयना धरणातून कर्नाटकसाठी पाणी सोडण्यात आले.

 

हे पाणी सांगलीच्या कृष्णा नदीत दाखल झाले असून सांगली बंधाऱ्यातून कर्नाटकला पाणी सोडले जात आहे.

 

कर्नाटकचा दुष्काळ हटवण्यासाठी महाराष्ट्राच्या कोयना धरणातून अडीच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

तर, कृष्णा नदीच्या 36 दरवाज्यातून 1 हजार क्यूसेक वेगाने पाणी कर्नाटकला सोडले जात आहे.

Exit mobile version