Mon. May 17th, 2021

पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय

पुण्यात भर दिवसा कोयता गॅंग परत एकदा सक्रिय झाली आहे. ही गॅंग पुन्हा हातात कोयता घेवून दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत होती. भर दिवसा हातात कोयते घेऊन आलेल्या चौघांनी लष्कर परिसरातील व्यावसायिकांना कोयत्याचा धाक दाखवत महिन्याला हप्ता देण्याची मागणी केली. तेथील काही दुकानांची तोडफोड देखील केली आहे. पोलीसांनी या कोयता गँगचा शोध घेत यातील चौघांना अटक केली आहे. लष्कर पोलिस ठाण्यात तक्रार आदित्य उर्फ मन्या भोसले व इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोयता गँग पुन्हा सक्रिय

भरदिवसा हातात कोयते घेऊन आलेल्या चौघांनी येथील लष्कर परिसरातील व्यावसायिकांना महिन्याला हप्ता देण्याची मागणी केली.

तसेच या चौघांनी दुकानांची तोडफोड केल्याची घटना मंगळवारी घडली आहे.

याप्रकरणी आदित्य उर्फ मन्या भोसले व इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी हातात कोयते घेऊन सकाळच्या सुमारास सिमेंटच्या ब्लॉकने दुकानाची तोडफोड केली.

त्या ठिकाणच्या सोसायटीत असणाऱ्या जनरल स्टोअर्सच्या व्यावसायिकालाही खंडणी मागण्यात आल्या आहेत.

तर दुसऱ्या दोन दुकानदारांनाही कोयत्याचे धाकाने धमकावत गोंधळ घालण्यात आला आहे.

इतर दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.मंगळवारी घडलेल्या या घटनेमुळे भरपूर गोंधळ उडाला होता.

या घटनेची माहिती मिळताच लष्कर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केलाय .

आदित्य (२८) सुशील दिनेश भडकवाल (२७, दोघे राहणार भवानी पेठ), संतोष गायकवाड (३५, मोदीखाना), जोन्स (३५) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *