Mon. May 23rd, 2022

नवाब मलिकांनी चोंबडेपणा थांबवावा – क्रांती रेडकर

  आर्यनखान ड्रग्जप्रकरणी मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप सुरू आहेत. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या आरोपावर त्यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी स्पष्टीकरण दिले. क्रांती रेडकर यांनी नवाब मलिकांना खुले आव्हान दिले आहे. नवाब मलिकांनी चोंबडेपणा थांबवावा असा सणसणीत टोला क्रांती रेडकरने नवाब मलिकांना दिला आहे.

 ‘मराठी असल्याचा मला अभिमान आहे, पण मला आणि मुलांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. नवाब मलिकांना काळच उत्तर देईल. समीर वानखेडेबाबत पुरावे असतील तर न्यायालयात द्या. ट्विट का करता?’ असा सवालही क्रांती रेडकर यांनी केला आहे.

  नवाब मालिकांकडून समीर वानखेडेंवर ट्विटरबाजी सुरू आहे. मात्र समीर वानखेडेंवर केलेले आरोप सर्व खोटे असून त्यात काहीच तथ्य ऩाही. त्यामुळे पुरावे असतील तर न्यायालयात द्या, ट्विट का करतात? असे क्रांती रेडकर म्हणाल्या. या प्रकरणामुळे माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्यासुद्धा येत असल्याचे त्या म्हणाल्या.

  नवाब मलिकांनी केलेल्या आरोपांवर क्रांती रेडकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पत्रकार परिषद आयोजित करून त्यांनी नवाब मलिकांना खुले आव्हान दिले आहे. तसेच पुरावे असतील न्यायालयात द्या, ट्विट का करतात असा सवालही त्यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.