Jaimaharashtra news

कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानने मोडलेला व्हिएन्ना करार नेमका काय?

साऱ्या देशाचं लक्ष लागून असलेला भारताचे सुपुत्र कुलभूषण जाधव यांचा फैसला आज हेग येथे आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावण्यात आला. जाधव प्रकरणी भारताची बाजू आंतरराष्ट्रीय कोर्टाने मान्य केली. पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केल्याचे ताशेरे आंतरराष्ट्रीय कोर्टाने ओढले. भारताला काऊन्सिलर ऍक्सेस न देणं हे व्हिएन्ना कराराचं उल्लंघन होतं. त्यामुळे भारताला काऊन्सिलर ऍक्सेस मिळणार आहे.

व्हिएन्ना करार नेमका काय आहे?

दुसऱ्या महायुद्धानंतर सर्व देशांना परस्परांमध्ये सौहार्द आणि मैत्रीपूर्ण संबंध ठेवणं गरजेचं वाटू लागलं.

त्यासाठी या देशांना आपापले राजनैतिक अधिकारी किंवा राजदूत दुसऱ्या देशांमध्ये कायमस्वरूपी ठेवण्याची गरज निर्माण झाली.

परंतु यासाठी काही विशेष तरतुदींची गरज होती.

राजनैतिक अधिकारी किंवा राजदूतांना दुसऱ्या देशात काही विशेषाधिकार आणि सवलती मिळतात.

18 एप्रिल 1961 रोजी आयोजित परिषदेत आंतरराष्ट्रीय कायदे मंडळाने अशा तरतुदी प्रत्यक्षात आणल्या.

ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नामध्ये या परिषदेचे आयोजन केले होते

त्यानंतर या तरतुदी व्हिएन्ना करार म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.

52 कलमी हा करार असून, राजनैतिक अधिकाऱ्यांच्या अधिकारांचे आणि सवलतींची त्यात माहिती आहे.

या कराराला 189 देशांनी मान्यता दिली आहे. भारताने 15 ऑक्टोबर 1965 रोजी कराराला संमती दिली.

यातील तरतुदींना 1972 मध्ये कायद्याचं स्वरुप प्राप्त झालं.

या कायद्यानुसार, राजनैतिक अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय दूतावासामध्ये त्रयस्थ व्यक्तीला प्रवेश करता येत नाही.

अशा अधिकाऱ्यांचा पत्रव्यवहार, चिन्हांकित बॅगांची झडती घेता येत नाही.

अशा व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष कर द्यावे लागत नाहीत.

राजनैतिक अधिकाऱ्यांवर कोणताही फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकत नाही.

 

 

# #-# #### convention

Exit mobile version