Mon. Sep 27th, 2021

कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडानंतर भारताची पाकिस्तानीविरोधी कठोर भूमिका

जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली

 

नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावल्यानंतर केंद्राने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेण्याची तयारी केली आहे. सर्वप्रथम पाकिस्तानी गायक, अभिनेत्यांना भारताचा व्हिसा देताना ‘सावध’ भूमिका घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

 

इस्लामाबादमधील भारतीय दुतावासाला व्हिसा देताना ‘सावध आणि संथगतीने जा’ असे निर्देश देण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते. कुलभूषण जाधवप्रकरणी पाकिस्तानवर दबाव टाकण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरु आहेत. 

 

सुरुवातीला भारताने सरसकट सर्व पाकिस्तानी नागरिकांनी भारताचा व्हिसा देणे बंद करण्याचा विचार केला होता. पण पहिल्या टप्प्यात पाकिस्तानी कलाकार, गायक यांच्या व्हिसावर निर्बंध आणायचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पाकिस्तानी कलाकार मंडळींना भारताचा व्हिसा मिळवणे कठीण होणार असे दिसते. 

 

भारताला पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा द्यायचा नव्हता. पण माणूसकीच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला नाही. विद्यार्थी किंवा रुग्णांना भारतीय व्हिसाची गरज भासू शकते हे ध्यानात ठेवून पाकिस्तानी कलाकार आणि गायकांसाठीच या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *