Sat. Jul 31st, 2021

मध्य रेल्वेची त्या स्टॉलधारकावर कारवाई

कुर्ला स्थानकात अयोग्य पद्धतीने अपायकारक लिंबू पाणी तयार करुन स्टॉलवर विक्री केली जात होती. हा सरबत बनवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.त्यानंतर अशा पद्धतीने बनवलेले पेय प्रवाशांच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याने यावरती कारवाई व्हावी यासाठी मागणी होत होती. त्यानुसार सरबत, काला खट्ट्यांसह इतर पेयांवरही रेल्वे प्रशासनाने बंदी घातली होती. तसेचं त्या स्टॉलधारकाला पाच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने सांगितले आहे.

मध्य रेल्वेची त्या स्टॉलधारकावर कारवाई

कुर्ला स्थानकातील अयोग्य पद्धतीने  लिंबू सरबत बनवितानाचा  व्हिडीओ वायरल झाला होता.
प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा स्टॉल  मध्य रेल्वेने बंद केला आहे.
कु्र्ला स्थानिकातील हा सरबत महापालिकेच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते.
प्रयोगशाळेतील अहवालानुसार हा सरबत आरोग्यासाठी अपायकारक असल्याचे निष्पन्न झाले आहे.
यानंतर मुंबई विभागातील 244 स्टॉलवरील खाद्यपदार्थ आणि पेयजलांचे नुमने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
तसेच कुर्ला स्थानकावरील स्टॉलधारकाला 5 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *