Fri. May 7th, 2021

गुन्हेगारच नव्हे तर तरुण पिढीही ‘कुत्ता गोळी’च्या विळख्यात!

मालेगावात पोलिसांच्या कारवाईत बेकायदा कुत्ता गोळी आणि गर्भपाताच्या गोळ्या विक्री करणारी टोळी पकडली गेली आहे. या कारवाईत पोलिसांनी 1 लाख 71 हजार रुपयांच्या गोळ्या जप्त केल्या आहेत आणि दोन जणांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

कुत्ता  गोळी  म्हणजे काय ?

या गोळीचं खरं नाव अल्प्रालोझम आहे.

ही गोळी झोप न येणे आणि मेंदूशी संबंधित रूग्णाला दिली जाते.

गोळी खाल्ल्यावर स्वतःवरचं नियंत्रण सुटतं.

या गोळीमुळे एक वेगळीच नशा होत असल्याने या गोळीला कुत्ता गोळी म्हटलं जातं.

ही टॅब्लेट शेड्युल वन कॅटेगरीत येते.

त्यामुळे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय ही गोळी देत नाहीत.

मात्र मालेगाव शहरात या गोळीची सर्रास बेकायदेशीर विक्री होतेय.

अनेक college students आणि तरुण या नशेच्या आहारी जातायत.

विशेष करून गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक या गोळीचे सेवन करून गंभीर स्वरूपाची गुन्हेगारी कृत्यं करत असल्याची माहिती पुढे आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *