Mon. May 17th, 2021

IPL 2019: कोलकाताची पंजाबवर 7 गडी राखून मात

आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत कोलकाता नाइट रायडर्स संघाने किंग्ज इलेव्हन पंजाब संघावर 7 गडी राखून मात केली आहे. मोहालीच्या पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर हा सामना झाला. पंजाबने कोलकातासमोर 184 धावांचे आव्हान ठेवले होते. शुभमन गिलचं अर्धशतक तसेच ख्रिस लिन, रॉबिन उथप्पा आणि आंद्रे रसेलच्या खेळीमुळे कोलकाताने हा विजय मिळवला आहे. या विजयामुळे कोलकाताच्या प्ले-ऑफच्या आशा कायम राहिल्या आहेत.

पंजाबचं 184 धावांचे आव्हान

किंग्ज इलेव्हन पंजाबने कोलकातासमोर 20 षटकांत 6 बाद 183 धावांच आव्हान ठेवलं.

ख्रिस गेल 14, तर लोकेश राहुल 2, धावांवर माघारी परतला. संदीप वॅरियरनेच या दोघांचीही विकेट काढली.

मयंक अगरवाल 36 आणि निकोलास पूरन 48  वर माघारी परतले.

अठराव्या षटकामध्ये मनदीप सिंग 25 धावांवर बाद झाला.

पंजाबचा कर्णधार रवीचंद्रन अश्विनला खाते उघडण्यातही अपयश आलं आहे.

करनने 24 चेंडूंमध्ये 7  चौकार व 2 षटकारांसह नाबाद 55 धावांची खेळी केली.

कोलकाता नाइट रायडर्सचा विजय

184 धावांच्या अव्हानाचा पाठलाग करताना शुभमन गिल आणि ख्रिस लिनने62  धावांची भागीदारी करुन दिली.

शुभमन गिल नाबाद 65  आणि ख्रिस लिन 46  धावांवर माघारी परतला.

यानंतर उथप्पाने 14  चेंडूंत 22  तर आंद्रे रसेलने 14 चेंडूंत 24 धावांपर्यंत मजल मारली.

गिलने 49  चेंडूंत 5 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 65  खेळीने पंजाबचा विजय झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *