Wed. Feb 19th, 2020

PMP च्या जुन्या bus मधून ‘ती Toilet’ ची निर्मिती!

पुणे शहरात वाढत्या लोकसंख्ये सोबत महिलांचा सामाजिक आणि इतर क्षेत्रातील वावरही वाढत आहे. तसंच महिलांना दररोज प्रवास करावा लागतो. महिलांसाठी सार्वजनिक स्वछतागृह कमी असून जी आहेत ती ही अस्वच्छ आहेत. त्यामुळे महिलांची नेहमीच कुचंबणा होत असते. परंतु यावर तोडगा काढण्यासाठी पुणे महानगरपालिकेने एक पर्याय शोधला आहे. तो म्हणजे ती toilet चा.

‘ती toilet’ ची निर्मिती –

महापालिका आणि सारा प्लास्ट या कंपनी एकत्र झाल्या आहेत.

जुन्या PMP बसच्या वापरातून ladies toilet ची निर्मिती केली.

ही बस सौरऊर्जेवर चालते.

बसमध्ये 1 वेस्टर्न आणि 3 इंडियन टॉयलेट तयार करण्यात आले आहेत.

प्रत्येक बसच्या देखभालीसाठी एक महिला कर्मचारी असेल.

बसमध्ये TV लावून स्वच्छतेची जनजागृती करण्यात येणार आहे.

शहरात प्रमुख 12 ठिकाणी मोबाईल व्हॅन टॉयलेट्स उभारण्यात आले आहे.

संभाजी उद्यान, शनिवारवाडा, शिवाजीनगर, बाणेर, स्वारगेट अशा प्रमुख ठिकाणी ही toilets असतील.

5 रुपये शुल्का सोबत wi-fi, shower अशा सोयी उपब्ध असतील.

टॉयलेट्स सोबतच food cafe ची ही व्यवस्था असेल.

कशी सुचली ही कल्पना?

भंगारात निघालेल्या गाड्यांचा वापर करून बेघर नागरिकांसाठी घरं तयार केली जातात. तशाच प्रकारे पुणे महानगरपालिका आणि सारा प्लांट याच्या माध्यमातून ‘ति’च्या काळजीसाठी mobile toilets उभी केली जात आहेत.

अशाप्रकारे ‘Pink Bus’ ची कल्पना अस्तित्वात आली.

महापालिका आयुक्तांसमोर ही कल्पना मांडली असून त्यांनीसुद्धा याला होकार दिला.

भविष्यात अशा toiletsचा विस्तार देखील केला जाणार आहे.

त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी होणारी ‘ति’ची कुचंबणा कमी होण्यास मदत होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *