Fri. Jan 21st, 2022

नाशिकमध्ये हॉटेल असोसिएशनचा स्तुत्य निर्णय, महिलांसाठी सर्वच हॉटेल्सची स्वच्छतागृह मोफत

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

नाशिकमध्ये सर्वच हॉटेलमध्ये महिलांना स्वच्छतागृह मोफत वापरता येणार आहे. कारण नाशिकमध्ये आता सर्वच हॉटेल्सबाहेर माहिलांसाठी मोफत स्वच्छतागृह उपलब्ध करुन देण्याचा निर्णय हॉटेल असोसिएशने घेतला आहे.

 

महापालिका आणि असोसिएशन यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे नाशिकमधील सर्व पंचतारांकित हॉटेलपासून साध्या रेस्टॉरंटमध्ये स्वच्छतागृह महिलांसाठी मोफत उपलब्ध करुन दिली जाणार आहेत.

 

अनेकदा महिला कामानिमित्त घराबाहेर पडतात तेव्हा महिलांची स्वच्छतागृहांअभावी परवड होत असल्याची बाब प्रकर्षाने राज्यात समोर आली. त्यामुळे हा नाशिकमध्ये हा निर्णय घेण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *