Wed. May 18th, 2022

‘लडकी हूँ, लड सकती हूँ’ कॅम्पेन गर्लने सोडली काँग्रेस

‘लडकी हूं, लड सकती हूं’ या प्रियांका गांधी यांनी सुरु केलेल्या मोहिमेचा चेहरा बनलेली प्रियंका मौर्य हिने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे, उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या प्रचाराला चांगलीच खीळ बसली आहे. प्रियंका मौर्या यांनी सरोजिनी नगर विधानसभा मतदारसंघातून तिकीट मागितले होते. मात्र, त्यांना तिकीट नाकारल्यानंतर प्रियांका मौर्य यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना प्रियंका मौर्यने भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेससाठी मोठा धक्का ठरू शकतो.

भाजपात प्रवेश केल्यानंतर प्रियंका मौर्य यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रियंका मौर्य म्हणाल्या, ‘मी माझ्या विधानसभा मतदारसंघात खूप मेहनत घेतली होती. मात्र, पक्षाने तेथून मला तिकिट दिले नाही. काँग्रेस महिलांच्या हक्काच्या चर्चा करते, पण येथे आमच्या हक्कांकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे काँग्रेसची मोहिम फसवी असल्याचा आरोप’ प्रियंका मौर्यने केला आहे.

2 thoughts on “‘लडकी हूँ, लड सकती हूँ’ कॅम्पेन गर्लने सोडली काँग्रेस

  1. Thanks for giving this specific excellent subject matter on your web-site. I noticed it on the search engines. I may check to come back if you publish additional aricles.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.