Sun. Jun 7th, 2020

ज्योतिषावर बलात्काराच्या आरोपाखाली ‘या’ TV अभिनेत्याला अटक!

टीव्ही मालिकेतील अभिनेता करन ओबेरॉयला बलात्काराच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. एका महिला ज्योतिषाला लग्नाचे आमिष दाखवून तीच्यावर बलात्कार केला असून त्याचा व्हिडीओ काढून ब्लॅकमेल केल्याप्रकरणी अटक केली आहे.मुंबईच्या ओशिवारा पोलिस ठाण्यात महिला ज्योतिषाने तक्रार दाखल केली आहे.

नेमकं प्रकरण काय ?

डेटिंग अॅपलिकेशनद्वारे करन ओबेरॉय आणि महिला ज्योतिषाची ओळख झाली.

त्यानंतर दोघांची चांगली मैत्री झाली.

करन ओबेरॉयने महिला ज्योतिषाला एका रुमवर बोलवून लग्नाचे आमिश दाखवून बलात्कार केला असा आरोप महिला ज्योतिषाने केला आहे.

नाराळचं पाणी पाजल्यानंतर महिला ज्योतिषाला चक्कर आली.

या संधीचा फायदा घेत करनने महिला ज्योतिषावर बलात्कार केल्याचा आरोप महिला ज्योतिषाने लावला आहे.

हा सर्व प्रकाराचा करनने व्हिडीओ बनवला असून महिला ज्योतिषाला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

बॅल्कमेल करून पैसे मागत होता. तसेच लग्नाबाबत विचारल्यावर विषय टाळत असल्याचेही तक्रारीत दाखल केले आहे.

महिला ज्योतिषाने कंटाळून मुंबईच्या ओशिवारा पोलीस ठाण्यात करण ओबेरॉयविरोधात तक्रार दाखल केली आहे.

ओशिवारा पोलिसांनी करनला बलात्काराच्या आरोपात अटक केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *