Fri. Jun 21st, 2019

झोपल्यावर वाईट स्वप्नं पडतात म्हणून …

121Shares

नाशिकमध्ये एका विवाहितेने स्वतःला जाळून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

मात्र तिच्या आत्महत्येचं कारण सासरच्यांचा छळ किंवा तत्सम कोणतंही नसून ते कल्पनेच्याही पलीकडचं आहे.

नाशिकच्या पाथर्डी येथे राहणाऱ्या एक महिलेला झोपल्यावर वाईट स्वप्न पडत असल्यामुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पाथर्डी गावातील मारुती मंदिर समोर राहत असलेली 40 वर्षीय महिलेने घरी झोपल्यावर वाईट स्वप्न पडत असल्यामुळे स्वत:ला जाळून आत्महत्या केली.

जयश्री भगत असे या महिलेचे नाव असून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला.

नेमकं प्रकरण काय ?

जयश्री भगत यांना रोज रात्री झोपेत वाईट स्वप्न पडायची.

यामुळे त्या मानसिक तणावखाली आल्या होत्या.

या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचे ठरवले.

गुरुवारी रात्री स्वत:वर रॉकेल ओतून पेटवून घेतलं.

या घटनेची माहिती मिळताच त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले.

मात्र 94 टक्के भाजल्याने उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात  तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून जयश्री यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्याला आला आहे.

121Shares

Leave a Reply

%d bloggers like this: