Fri. Feb 21st, 2020

महिला कॉन्स्टेबल गँगस्टरच्या प्रेमात, जेलमधून थेट लग्नाच्या मांडवात

आत्तापर्यंत अनेक सिनेमा किंवा सिरीयल्समध्ये पोलीस आणि गँगस्टर यांच्यातील प्रेमकहाणी तुम्ही पाहिली असेल. मात्र नोएडा येथे एका महिला कॉन्स्टेबलने कुख्यात गँगस्टरशी विवाह केल्याची घटना घडलीय. राहुल ठसराना असं या गुंडाचं नाव आहे.

कशी जमली ही जोडी?

2014 साली नोएडा येथे मनमोहन योगल हत्याकांड घडलं होतं.

या हत्याकांडात सहभागी असणाऱ्या राहुल ठसराना या दुजाना गँगच्या शूटरला अटक करण्यात आलं.

कोठडीमध्ये त्याच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी महिला कॉन्स्टेबलकडे होती.

सुनावणीच्या वेळी हिच कॉन्स्टेबल त्याला कोर्टात हजर करत असे.

या भेटींमध्येच त्यांच्यातील प्रेम फुललं. दोघांनी लग्नाचाही निर्णय घेतला. त्यानंतर आता दोघांनी मंदिरात जाऊन लग्न केलं आहे. सध्या या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *