Sat. Jul 31st, 2021

अत्याधुनिक हॉक जेट विमान उडवणारी ‘ही’ पहिली महिला

सध्याच्या मॉर्डन युगात महिला सर्व क्षेत्रात ठसा उमटवताना दिसत आहेत.फ्लाईट लेफ्टनंट मोहना सिंहने नविन इतिहास रचला आहे.अत्याधुनिक हॉक जेट विमान उडवणारी फ्लाईट लेफ्टनंट मोहना सिंह पहिली महिला वैमानिक ठरली आहे.

हॉट जेक विमान उडवणारी पहिली महिला कोण ?

२०१६ मध्ये भावना कंठ, मोहना सिंह, आणि अवनी चतुर्वैदी यांची लढाऊ वैमानिक प्रशिक्षणासाठी निवड झाली.

यापूर्वी फ्लाइट लेफ्टनंट भावना कंठ युद्ध मोहिमेत सहभागी झाली आणि पहिली लढाऊ वैमानिक होण्याचा मान पटकावला.

भावनाने लढाऊ विमान मिग-२१ चं उड्डाण करत मिशन पूर्ण केलं होतं.

भावनाने दिवसा लढाऊ विमानाचं उड्डाण करत मिशनमध्ये यश प्राप्त केले असल्याची माहिती वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

भावना भारतीय हवाई दलातील पहिल्या बॅचची लढाऊ वैमानिक आहे.

भावनासोबत दोन अन्य महिला वैमानिक अवनी चतुर्वैदी आणि मोहना सिंह यांची २०१६ मध्ये प्लाइंग ऑफिसर म्हणून निवड करण्यात आली.

विशेष म्हणजे केंद्र सरकारने प्रायोगिक तत्त्वावर महिला वैमानिकांनी युद्ध मिशनमध्ये सहभागी होण्याचा मार्ग मोकळा केला होता.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *