Sun. Aug 18th, 2019

लिफ्टमध्ये घुसून महिलेचा विनयभंग, वांद्र्यातील धक्कादायक प्रकार

0Shares

मुंबईच्या वांद्रे येथे एका सोसायटीच्या लिफ्टमध्ये घुसून महिलेचा विनयभंग करण्यात आला आहे. या प्रकरणी एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहे.

काय घडलं नेमकं ?

वांद्रे पश्चिम येथील एका उच्चभ्रू सोसायटीत पीडित महिला राहते.
ही महिला मुव्ही पाहण्यासाठी मैत्रिणींसोबत गेली होती.
मुव्हीनंतर ती घरी येताना इमारतीच्या लिफ्टमध्ये चेहऱ्याला रुमाल बांधलेला एक अज्ञात इसम  घुसला.
महिलेने त्या इसमाला कितव्या मजल्यावर जाणार असे विचारले तरीही त्याने काहीच उत्तर दिले नाही.
लिफ्ट दुसऱ्या मजल्यावर गेल्यानंतर फरार आरोपीने महिलेचा विनयभंग केला.
त्याच्या चेहऱ्यावरील रुमाल काढण्याचा तिने प्रयत्न केला, पण तो तिथून पळून गेला.

या प्रकारामुळे महिलेला मानसिक धक्का बसला. तिने यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. आरोपीने चेहऱ्यावर रुमाल बांधला असल्याने त्याचा चेहरा ओळखणं कठीण झालं आहे. मात्र जर घरांच्या लिफ्टमध्येही अशा प्रकारे महिलांचा विनयभंग होत असेल, तर मुंबईमध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न नक्कीच गंभीर होत असल्याचा निष्कर्ष निघतो.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *