Mon. Oct 25th, 2021

बुलडाण्याच्या महिला पोलिस मोनाली जाधवचा चीनमध्ये ‘हा’ विक्रम!

चीनमध्ये झालेल्या जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय पोलीस दलाचे प्रतिनिधीत्व करत असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील जलंब पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत महिला कॉन्स्टेबल मोनाली हर्षचंद्र जाधव हिने तिरंदाजीमध्ये विक्रमी कामगिरी नोंदवली. ‘टार्गेट आर्चरी’मध्ये 720 पैकी 76 गुण मिळवित दोन सुवर्ण पदक आणि एक कांस्य पदक पटकावलं आहे.

मोनाली जाधव 2013 मध्ये पोलीस दलात भरती झाली.

ती बुलडण्यामधील आनंद नगर येथील राहवासी आहे.

ती जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे.

सध्या ती जलंब पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहे.

चीनच्या चेंगडू येथे 8 ते 18 ऑगस्ट दरम्यान जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धा झाल्या.

यामध्ये मोनालीने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर सर्वांचं लक्ष वेधलं.

फिल्ड आर्चरीमध्ये सुवर्ण, तर ‘थ्रीडी’ आर्चरी प्रकारात कांस्य पदक मिळवलं.

मे महिन्यात शांघाय येथे झालेल्या विश्व स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करीत जागतिक स्तरावर नववं स्थान मिळवलं होतं.

मोनाली जाधवला तिरंदाजी प्रशिक्षक चंद्रकांत इलग आणि सुरेश शिंदे यांचं मार्गदर्शन मिळालंय. तसंच पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचे प्रोत्साहन मिळालं. मोनालीच्या या यशाबद्दल बुलडाणा जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.दिलीप भुजबळ पाटील यांनी त्याचे अभिनंदन केलं. तर बुलडाणा जिल्ह्यातून मोनालीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *