मानसिक तणावामुळे कांदिवलीत महिलेची आत्महत्या

कांदिवलीतील चारकोप परिसरात राहणाऱ्या एका 40 वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. डिंपल वाडीलाल असं या महिलेचे नाव असून तिने मानसिक तणावात येऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
डिंपल वाडीलाल या आपल्या आईसह चारकोप येथील रॅाक एव्हेन्यू बिल्डींगमध्ये वास्तव्यास होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांना कामावरून काढून टाकले होते. त्यामुळे त्या मानसिक तणावाखाली होत्या.
मानसिक तणावामुळे डिंपल यांनी मित्रमंडळी आणि इतरांशी ही बोलणेही बंद केलं होते. यानंतर डिंपल यांनी गुरूवारी रात्री बिल्डींगच्या गच्ची वरून उडी मारून आत्महत्या केली.
डिंपल जीव देत आहेत हे पाहताच स्थानिक रहिवाशांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र डिंपल यांनी ऐकले नाही. आणि खाली उडी मारली. उडी मारल्यानंतर बिल्डींगखाली उभ्या असलेल्या एका व्यक्तींनं त्यांना झेलण्याचा प्रयत्न केला. यात त्या व्यक्तीच्या खांद्याला दुखापत झाली.
स्थानिकांनी डिंपल वाडीलाल यांना कांदिवलीच्या शताब्दी हॅास्पिटलमध्ये उपचारासठी दाखल केले. डॅाक्टरांनी डिंपल यांना मृत घोषित केले.
मानसिक तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या घटनेचा अधिक तपास चारकोप पोलीस करत आहेत.