Sat. Feb 22nd, 2020

लालबागच्या राजाच्या दानपेटीत ‘इतक्या’ किलोचे सोन्याचे ताट आणि वाटी

यंदा एका भाविकांने सोन्याचं ताट , दोन वाट्या , एक ग्लास , दोन चमचे राजाच्या दान पेटित अर्पण केले आहेत.

मुंबईच्या लालबागचा राजाची सर्वत्र ख्याती आहे. त्यामुळे गणेशोत्सवात येथे रोज हजारो गणेशभक्त दर्शन घेण्यासाठी येत असतात. यावेळी भाविक राज्याच्या दानपेटीत मोठ्या प्रमाणात दान सुद्धा टाकत असतात. यंदा एका भाविकांने  सोन्याचं ताट, दोन वाट्या, एक ग्लास, दोन चमचे राजाच्या दान पेटीत अर्पण केले आहेत.

याच वजन1 किलो 237 ग्रॅम  22 कॅरेट म्हणजेच जवळजवळ 45 लाख पेक्षा अधिक किंमतीचे आहे.  तसेच राज्याच्या दानपेटीत अनेक सोन्या चांदीच्या वस्तू आल्या आहेत. यामध्ये अमेरिकन डॉलर, चांदीचे मोदक, आणि सोन्या – चांदीचे अनेक दागिने अशा प्रकरच्या वस्तू राजाच्या चरणी अर्पण करण्यात आल्या.

या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी माेठमोठे सिनेस्टार, तसेच राजकारणी लोक येत असतात. देशाचे केंद्रीय मंत्री अमित शाह यांनीही लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.  केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी लालबागच्या राजाच्या दर्शनाला
आल्यांनातर रांगेत उभे असलेल्या सर्व भाविकांनी मोदी, मोदी आणी अमित शहा अशी घोषणाबाजी करायला सुरुवात केली.  यावर्षी राजाला चांद्रयानचा देखावा केला आहे.

आज सकाळपासून  मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे..त्यामुळे भाविकांची गर्दी ही कमी  प्रमाणात होती.लालबाग राजा दर्शनासाठी मुखदर्शनाच्या रांगेत आज फार कमी गर्दी पाहायला मिळते..

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *