Thu. Jun 17th, 2021

… अन् रुग्णालयात लालू प्रसाद यादव किंचाळले

लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर एनडीएला बहुमत मिळाले आहे. बिहारमध्ये 40 जागांपैकी 39 जागांवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जिंकून आले आहेत. लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडी पक्षाला एकही जागा मिळाली नसल्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे. रुग्णालयात उपचारासाठी लालू प्रसाद यांना दाखल केले असून लालू अचानक किंचाळले असल्याची घटना घडली आहे.

नेमकं प्रकरण काय ?

बिहारमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत 40 जागांपैकी 39 जागांवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जिंकले आहेत.

लालू प्रसाद यादव यांचा पक्ष आरजेडीला एकही जागा मिळाली नाही.

जागा मिळाल्या नाही म्हणून लालू प्रसाद यादव यांना धसका बसल्याचे म्हटलं जातं आहे.

लालू प्रसाद यादव यांच्यावर उपचार सुरू आहे.

त्याचबरोबर त्यांच्या खोलीतील वीज गेल्याने एसी बंद पडला.

एसी बंद झाल्यामुळे बंद खोलीत लालू प्रसाद यादव यांना गुदमरल्यासारखे झाले.

त्यामुळे लालू प्रसाद अचानक किंचाळले.

लालू प्रसाद यादव यांना काही काळ खोलीबाहेर फिरवले तेव्हा त्यांना बरं वाटलं.

लालू प्रसाद यादव सध्या चारा घोटाळ्याप्रकरणी शिक्षा भोगत आहेत.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *