लालूप्रसाद यादवांच्या घरावर आयकर विभागाचा छापा
वृत्तसंस्था, बिहार
एक हजार कोटींच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी, आयकर विभागाने लालू प्रसाद यादवांच्या घरावर छापे टाकले आहेत. दिल्ली एनसीआर आणि गुडगांवमधील लालू प्रसाद यादव कुटुंबीयांच्या सर्व मालमत्तांची चौकशी सुरू आहे.
सकाळी 8.30 वाजेपासून आयकर विभागाची ही कारवाई सुरू असून आयकर विभागाच्या छाप्यानंतर जनता दल यूनायटेडच्या नेत्यांनी केवळ विरोधकांवरच कारवाई का करण्यात येतेय.? असा सवाल उपस्थित केला आहे.