Sat. Sep 21st, 2019

परशुराम घाटात दरड कोसळण्याचं सत्र सुरूच, वाहतुकीवर परिणाम

परशुराम घाटात दरड कोसळली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्यात अशी स्थिती निर्माण झाली आहे.

0Shares

पावसाळा सुरू झाल्यापासून दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. नुकतीच परशुराम घाटात दरड कोसळली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्यात अशी स्थिती निर्माण झाली आहे. या घटनांमुळे लोकांवर जीव मुठीत घेवून प्रवास करण्याची वेळ आली आहे.

दरड कोसळण्याच्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीती

गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाने झोडपले आहे. यामध्ये कोकणात मुसळधार पाऊस पडला आहे.

रत्नागिरीत मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.

परशुराम घाटात दरड कोसळण्याचं सत्र सुरू असून मंगळवारी पुन्हा एकदा या भागात दरड कोसळली आहे.

याचा परिणाम म्हणजे मुंबई – गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.

या दिवसात काही दिवसात सातत्याने दरड कोसळल्याने वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झाला आहे.

या मार्गावरून प्रवास करणाऱ्या लोकांमध्ये यामुळे भीती पसरली आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *