Wed. Nov 13th, 2019

जळगावमध्ये शेतात काम करणाऱ्या दाम्पत्यावर बिबट्याचा हल्ला

शेतात काम करत असताना बिबट्याने एका शेतकरी दांपत्यावर हल्ला केला. यामध्ये शेतकऱ्याच्या पत्नीने शेतकऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तरीसुद्धा भरत चव्हाण आणि मनिषा चव्हाण ह्या शेतकरी  दांपत्याला बिबट्याने गंभीर जखमी केले आहे.

शेतात काम करत असताना बिबट्याने एका शेतकरी दांपत्यावर हल्ला केला. यामध्ये शेतकऱ्याच्या पत्नीने शेतकऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तरीसुद्धा भरत चव्हाण आणि मनिषा चव्हाण ह्या शेतकरी दांम्पत्याला बिबट्याने गंभीर जखमी केले आहे. सध्या जळगावच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ही घटना पारोळा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे घडली आहे

नेमकं काय घडलं?

भरत चव्हाण आपल्या पत्नीसह आणि एका तान्हुल्या मुलासह शेतामध्ये आले होते आणि शेतामध्ये सर्वात प्रथम त्यांनी झाडाला आपल्या लहान बाळासाठी झोळी तयार केली त्यात बाळाला टाकले हे करत असतानाच त्यांच्या पत्नीवर  बिबट्याने हल्ला केला.
पत्नीच्या खांद्याला आणि पाठीमागून कमरेला  बिबट्याने  पकडल्यानंतर  भरत चव्हाण यांनी आपल्या पत्नीला बिबट्याच्या तावडीतून सोडविले आहे मात्र त्यानंतर या बिबट्याने भरत चव्हाण यांच्यावर हल्ला चढवला यात यांच्या हाताला पायाला डोळ्याला पोटाला अनेक ठिकाणी चावे घेतले आहेत तर नखांनी ओरबाडले आहे.
एक हात बिबट्याने संपूर्णपणे आपल्या तोंडात पकडून ठेवला होता बराच वेळ झटापट चालू होती हे दृश्य पाहून परिसरातील शेतकरी आणि शेतमजूर सुद्धा समोर येण्यास धजावत नव्हते.
यावेळी या शेतकऱ्यांच्या पत्नीने मोठ्या हिमतीने बिबट्याला आपल्या पायाने दाबून ठेवले णि गावकर्‍यांनी कडून मदतीची याचना केली त्यावेळेस गावातील एका तरुणाने पुढाकार घेऊन बिबट्याला दगडाने मारत शेतकरी दाम्पत्याला बिबट्याच्या तावडीतून सोडविले आहे
मात्र या सर्व प्रकरणांमध्ये शेतकरी दांपत्य गंभीर जखमी झालेलं आहे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत मात्र कोणत्याही राजकीय नेत्याने आपल्याकडे फिरकून देखिल पाहिले नसल्याचा आरोप या शेतकरी दाम्पत्याने केलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *