Mon. Jan 17th, 2022

नाशकात सर्वात मोठा सरकारी ऑक्सिजन प्रकल्प सुरू

नाशिकमध्ये राज्यातील सर्वात मोठा सरकारी ऑक्सिजन प्रकल्प उभारला आहे. नाशिक महापालिकेने ३ कोटी रुपये खर्च करून ११४ ते १४० टन क्षमतेचा ऑक्सिजन प्रकल्प उभारला आहे. त्यामुळे आता नाशिकसह उत्तर महाराष्ट्राला ऑक्सिजनचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होणार आहे.

कोरोना काळात अनेक नागरिकांना ऑक्सिजन अभावी जीव गमवावा लागला. मात्र आता नाशिक जिल्ह्यात पालिकेने सर्वात मोठ्या प्रमाणातला ऑक्सिजन प्रकल्प उभारला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांसह खाजगी रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होणार आहे.

यापूर्वी नाशिक पालिकेकडे केवळ १३ मेट्रिक टन इतक्या ऑक्सिनची क्षमता होती, मात्र आता पालिकेने तब्बल ३ कोटी रुपये खर्च करून ११४ ते १४० मेट्रिक टन क्षमतेचा ऑक्सिजन प्रकल्प उभारला आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्वात मोठा सरकारी ऑक्सिजन असलेला प्रकल्प नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात ऑक्सिनज पुरवठा करू शकेल असा दावा, पालिका आयुक्तांनी केला आहे.

नाशकात ९५ टक्के रुग्णांवर घरीच उपचार

नाशिकमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या २४ तासांमध्ये नाशिकमध्ये १ हजार ४७ नव्या कोरोना रुग्णांचीन नोंद झाली आहे. तर सध्या २२० कोरोनाग्रस्तांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र नाशिकमधील ९५ टक्के कोरोना रुग्ण घरीच उपचार गेत आहेत. तसेच रुग्णालयातील कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्यामुळे प्रशासनाला दिलासा मिळाल आहे. तर नागरिकांनी खबरदारी घेत काळजी घेण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *