Sun. Mar 7th, 2021

26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदवर ईडीची कारवाई

लष्कर-ए- तोयबा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आणि 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा गुरुग्राममधील बंगला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) जप्त केला आहे. या बंगल्याची किंमत कोट्यवधी रुपये असल्याने (ईडी) मोठा दणका हाफिज सईदला बसला आहे. प्रतिबंधित दहशतवाद्यांच्या यादीतून वगळण्याचे सईदचे अपील संयुक्त राष्ट्राने नुकतेच फेटाळले होते.आता ईडीने ही कारवाई केली आहे.

कोण आहे हा हाफिज सईद?

हाफिज सईद हा लष्कर-ए- तोयबा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आणि 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे.

मुंबई हल्ल्यानंतर हाफिजवर  संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने १० डिसेंबर २००८ बंदी घातली होती.

हाफिजने २०१७ मध्ये या बंदीविरोधात लाहोर येथील लॉ फर्म मिर्झा अँड मिर्झाच्या माध्यमातून अपील दाखल केले होते.

हाफिज सईद हा पाकिस्तानमध्ये नजरकैदेत होता.

का केली हाफिज सईदची मालमत्ता जप्त?

फलाह-ए- इन्सानियत फाऊंडेशनच्या माध्यमातून  या बंगल्यासाठीचे पैसे  त्याने  उभे केले होते.

हाफिज सईदने काश्मीरमधील उद्योजक जहूर अहमद शाहर वटाली याच्या मदतीने गुरुग्राममध्ये बंगला विकत घेतला होता.

उद्योजक जहूरला गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये दहशतवादाला आर्थिक रसद पुरवल्याप्रकरणी अटक झाली होती.

जहूर याची  चौकशी केल्यानंतर हाफिजच्या मालमत्तेसंबधीची माहिती समोर आली होती.

हाफिज सईदने बनावट नावांचा वापर करुन भारतात तब्बल 24 ठिकाणी मालमत्ता खरेदी केल्याचे ईडीच्या तपासातून समोर आले आहे.

मालमत्तेच्या खरेदीसाठी वापरण्यात आलेल्या बँक खात्यांचा तपशीलही ईडीने गोळा केल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

उर्वरित मालमत्तांवरही लवकरच जप्तीची कारवाई केली जाईल, असे ईडीतील सूत्रांनी सांगितले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *