Fri. Jan 28th, 2022

#SushmaSwaraj पंचत्वात विलीन, मुलीने दिला मुखाग्नि

माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्या पार्थिवावर दिल्लीतील लोढी रोड येथील स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याआधी शासकीय इतमामाप्रमाणे त्यांना सलामी देण्यात आली. माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांचं पार्थिव दिल्लीच्या भाजपा मुख्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं.

सुषमा स्वराज यांचे अंत्यविधी त्यांची कन्या बांसुरी स्वराज हिने पार पाडले आणि तिनेच मुखाग्नि दिला.

विद्युतदाहिनीमध्ये सुषमा स्वराज यांचे अंत्यविधी करण्यात आले.

सुषमा स्वराज यांना अखेरचा निरोप देण्यासाठी भाजपमधील दिग्गज नेते उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, BJP चे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांच्यासमावेत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, जे. पी. नड्डा यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांचीही उपस्थिती होती. यावेळी लालकृष्ण अडवाणी आणि पंतप्रधान मोदी यांना अश्रू अनावर झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *