Sun. Jun 20th, 2021

हे ठरले सुषमा स्वराज यांचे शेवटचे ट्विट….

सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर सर्वच स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. यापुर्वी त्यांनी कलम 370 च्या सरकारच्या यशावर त्यांनी ट्विट् केले आहे. ते त्यांचे शेवटचे ट्विट ठरले आहे.

भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं मंगळवारी रात्री उशीरा दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झालं. त्या ६७ वर्षांच्या होत्या. रात्री उशीरा हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र रुग्णालयात त्यांनी डॉक्टरांच्या उपचाराला प्रतिसाद दिला नाही. सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर सर्वच स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. यापुर्वी त्यांनी कलम 370 च्या सरकारच्या यशावर त्यांनी ट्विट् केले आहे. ते त्यांचे शेवटचे ट्विट ठरले आहे.

हे सुषमा स्वराज यांचे शेवटचे ट्विट

सुषमा स्वराज्य यांनी मंगळवारी संध्याकाळी टिवीट् केलं होतं. कलम 370 बाबत निर्णय घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केलं आहे.‘प्रधान मंत्री जी – आपका हार्दिक अभिनन्दन. मैं अपने जीवन में इस दिन को देखने की प्रतीक्षा कर रही थी,’असं त्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

मी माझ्या आयुष्यात याच दिवसाची वाट पाहत होते’ असे शब्द असणारे हे ट्विट स्वराज यांच्या निधनाच्या बातमीनंतर चांगलेच व्हायरल झाले आहे. राज्यसभा आणि लोकसभेत कलम 370 हटवण्याचा प्रस्ताव अमित शाह यांनी मांडला. त्यांचे ही अभिनंदन सुषमा स्वराज यांनी केले आहे. गृह मंत्री श्री अमित शाह जी को उत्कृष्ट भाषण के लिए बहुत बहुत बधाई. असं टविट् मध्ये म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील टविट् करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सरकारच्या पहिल्या 5 वर्षांच्या कार्यकाळात स्वराज यांनी परराष्ट्र मंत्रालयाचा पदभार अतिशय उत्तमरित्या सांभाळला आहे. देशाचं परदेश धोरण मजबूत करण्यामध्ये सुषमा स्वराज्य यांची महत्वाची भुमिका बजावली आहे. असं म्हणत त्यांच्या कार्यकाळातील त्यांनी केलेल्या अनेक कामांबद्दल मोदींनी कौतुक केले आहे.

त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिला आहे. सर्वच स्तरातून याबद्दल शोक व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *