लतादीदींच्या अस्थी प्रभुकुंज निवासस्थानी

भारतरत्न लता मंगेशकर यांचे काल निधन झाले. वयाच्या ९३व्या वर्षी भारतरत्न लता मंगेशकर यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. काल सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. सर्व स्तरातून लता दीदींना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
आज लता मंगेशकर यांच्या अस्थी कुटुंबातील सदस्य प्रभुकुंज निवासस्थानी नेणार आहेत. आदिनाथ मंगेशकर दीदींच्या अस्थी घेऊन निवासस्थानी रवाना झाले आहेत.
भारतरत्न लता मंगेशकर पंचत्वात विलीन झाले आहेत. लता दीदींच्या निधनामुळे केंद्रासरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा घोषित केला आहे. तर राज्यात सोमवारी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. देशातील स्वर्गीय सुर हरपल्यामुळे संपूर्ण देशात शोक व्यक्त होत आहे. सर्व स्तरातून लता दीदींना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिहं कोश्यारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह संगीत, क्रीडा क्षेत्रातील सर्वांनीच लता दीदींना श्रद्धांजली वाहिली आहे.