Thu. Jun 17th, 2021

७२ वर्षीय धावपटू लता करे यांच्या पतीचं निधन

बारामती येथील ७२ वर्षीय धावपटू लता करे यांचे पती भगवान करे यांचे कोरोनामुळे निधन झाले. २०१३ मध्ये बारामती शहरातील मॅरेथॉन स्पर्धेत लता करे यांनी सहभाग घेतला होता. पतीच्या हृदयविकारावरील उपचारासाठी या स्पर्धेत अनवाणी धावत प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या.

लता करे यांच्या पतीला कोरोनाची लागण झाली होती. बारामती येथील रुग्णालयात त्यांच्या पतीवर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान बुधवारी रात्री त्यांच्या पतीचे निधन झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *