Tuesday, January 14, 2025 04:10:12 AM

Sanjay Raut
'सरन्यायाधीशांनी खटल्यातून बाहेर पडावं'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. या घटनेमुळे शिउबाठाचे खासदार संजय राऊत नाराज झाले.

सरन्यायाधीशांनी खटल्यातून बाहेर पडावं

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. या घटनेमुळे शिउबाठाचे खासदार संजय राऊत नाराज झाले. पंतप्रधान मोदींनी चंद्रचूड यांच्या घरी जाऊन गणपतीची आरती केली... बाप्पाचं दर्शन घेतलं... आता सरन्यायाधीशांनी खटल्यातून बाहेर पडावं... न्याय मिळेल असं वाटत नाही, असे संजय राऊत म्हणाले. आमदार अपात्रता तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणाची याबाबतच्या खटल्यांची न्यायालयीन सुनावणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी हे वक्तव्य केले. 


सम्बन्धित सामग्री